Saturday, October 25, 2008

Thanks Giving

11/19/2007


मला सध्या ४-५ दिवसांची सुट्टी आहे. (त्यामुळे रोज Jim आणि swimming चालुआहे).Thanks Giving नावाचा सण असतो ह्यांचा, त्याबद्द्ल.ह्यात सण साजराकरण्यासारख काय आहे हे मला खरच कळत नाही.एक तर ही लोका जाता येता उठताबसता escuse me,thank you म्हणत असतात.Footpath वरुन जाताना एकमेकांच्यासमोरुन (ती एका कडेनी आणि मी दुसर्या कडेनी...) गेल की thank you किंवाescuse me.जिन्यात एकमेकांना cross झाला की thank you.अरे काय लावलय काय? (एवढ्या आम्ही शिव्या पण देत नाही..). पहिल्या पहिल्यांदा रस्त्यावरुनजाताना कोणाकडे पाहिला की ती व्यक्ती smile द्यायची तेव्हा special वाटायचा.नंतर आजी-आजोबांनी पण smile दिल्यावर लक्षात आला की ही यांचीपध्दतच आहे.आत मी आजी-आजोबांकडे पहात नाही.तर आता मला ही लोका या सणाला thanks giving म्हणजे exactly काय करतातयाची भयंकर उत्सुकता आहे.ते एकदा लक्षात आल की मी त्याच धर्तीवर 'मारा टोमणे' नावाचा सण पुण्यात सुरु करयाच्या विचारात आहे.

बाकी सर्व ठीक. (फक्त California मधे वणवा पेटला..आत मी आल्यावर अश्याछोट्या मोठ्या गोष्टी व्हायच्याच. मुंबईत पहिल्यांदा गेलो तर पूर आला होता...)

पत्रिका


आमचा एक मित्र आहे. तसे आमचे अनेक मित्र आहेत. पण ते नुसतेच आहेत.काही लोकांच्या दर्शनानी आपल डोळे दिपुन जातात (आणि कान बंद करुन घ्यायची सोय देवानी का केली नाही असा प्रश्न मिनिटा मिनिटाला पडतो..)अश्या लोकांपैकी हा आमचा मित्र आहे.आपण नाव नको घेउयात. मी म्हणतो नावात काय आहे ? (बरेच लोक हे,कोणीएक शेक्सपियर की काय त्याच वाक्य आहे अस सांगतात. तिकडे लक्ष देऊ नये.)आडनाव जोशी आहे अस धरुयात.( धरुयात, म्हणजे आहेच...पण इतके जोशी आहेत की, रस्तामधे चालताना जर दहा माणस पाय घसरुन खड़्यात पडली, तर त्याच्यात सहा जोशी असतात अस आमच संशोधन सांगत...म्हणुन धरुयात म्हटल की प्रत्येक जोश्याला वाटणार दुसर्या बद्दल बोलतोय..)तर कल्पना अशी करतोय की या जोश्याच लग्न ठरल. जे ह्याला ओळखतात त्यांना ही कल्पना भयंकर वाटेल. पण कल्पना करायची तर जबरदस्त करायची. कोणी म्ह्टल कि "समजा तुम्ही गोडाच जेवत आहात", तर एकदम पानात शिकरण आहे. अशी कल्पना नाही करायची. याच लग्न ठरल तर पत्रिका कशी असेल ? याला त्रास नको म्हणुन आम्हीच पत्रिका लिहित आहोत.

श्री धीरुभाई अंबानी प्रसन्न

आमचे येथे श्रीकृपेवरुन आमचे सुपुत्र, हरिभक्तपरायण, थोर विचारवंत, मितभाषी चि. --- जोशी आणी चि. सौ. कां. कोणीतरी यांचा विवाह निश्चित करण्यात आला आहे. तरी विवाहसमारंभ घरगुती स्वरुपाचा असल्यामुळे, त्यानंतर होणार्या पानसुपारी कार्येक्रमास उपस्थित रहावे.

कृपया पुष्पगुच्छ आणु नयेत.

काही सुचना,

१. आयत्या वेळी जर नवरा मुलगा " बघु नंतर, काय घाई आहे ? " (हे जनात ...)(क्या करना है ? गटर फुंकनेकोही जाना है ना ? हे मनात..) म्हणाला आणि लग्नसमारंभ होउ शकला नाही तर जोशी कुटुंबीय जबाबदार रहाणार नाहीत.

२. आपण उपस्थित राहु शकणार नसाल तर कृपया आगाऊ कळवावे. त्याप्रमाणे पान आणि सुपार्यांची खरेदी करता येईल.

३. साधी रहाणी ( आणि फाटकी विचारसरणी....) असे नवर्यामुलाचे उच्च विचार असल्यामुळे लग्न समारंभ "35 शुक्रवार " या पत्त्यावरील वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील डावीकडील अंधार्या खोलीत संपन्न होईल.

४. "आयुर्वेदीय भांडार" हे तळमजल्यावरील दुकान सकाळी ८.३० वाजता उघडण्याला ७५ वर्षांची परंपरा असल्यामुळे लग्न समारंभ ८.३० च्या आत संपेल आणि नवरा मुलगा व मुलगी दुकानात आहेर स्विकारण्यासाठी व (पाहिजे असल्यास) पानसुपारी देण्यासाठी उभे रहातील.

५. चेक, सर्व प्रकारची डेबिट आणि क्रेडिट कार्डस स्विकारण्याची सोय केली आहे.

६. आहेर म्हणुन शेर्यस दिल्यास पहिल्या मजल्यावर जेवण मिळेल.

७. गेली ७५ वर्ष दुपारी १२ ते ४ दुकान बंद ठेवण्याची प्रथा असल्यामुळे १२ वाजता नवरा मुलगा व मुलगी दुकान बंद करुन वर जातील. मग जेवण आणि (आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ) २ तास वामकुक्षी असा भरगच्च कार्येक्रम आहे.

८. दररोज संध्याकाळी 'युवाशक्ती' या गिर्यारोहण संस्थेच्या विनामुल्य सेवेसाठी जाण्याचा नवर्यामुलाचा शिरस्ता असल्यामुळे "35 शुक्रवार" ते "४३० नारायण " अशी नवीन जोडप्याची पदयात्रा आम्ही निश्चीत केली आहे. यामुळे नव्या नवरीला शुक्रवार, शनिवार, नारायण या पेठा आणि नागनाथपार, शनीचा पार, हमालवाडा या नयनरम्य परिसराच दर्शन घडेल.

९. पुढील वर्षी मे महिन्यामधे नवरा मुलगा 'युवाशक्ती' या गिर्यारोहण संस्थेच्या गिर्यारोहण मोहिमेवर गटप्रमुख म्हणुन (फुकट) जाईल त्याठिकाणी १५ दिवस मधुचंद्राची व्यवस्था केली आहे.

आम्ही नवपरिणित जोडप्यासाठी सुखी वैवाहिक जीवनाची कामना करतो आणि नव्या नवरीचे सुयश चिंतीतो.

आपल्या अमुल्य वेळाबद्दल ( जोशी मित्र ) मंडळ आपले आभारी आहे.

आपला नम्र,

घर-दार

MS साठी visa मिळाल्यानंतर "आता फक्त हा ticket काढणार आणि (एकदाचा..) जाणार" अशी अनेकांची समजुत असते (विशेषतः घरच्यांची आणि नातेवाईकांची.तिथे विमानतळावर उतरल्यावर अमेरिकान government च्या वतीनी chauffeur-( by the way Google वर spelling सुध्दा शोधता येतात !!)- driven car मग university कडुन राहायची सोय अश्याही कल्पना असव्यात.) पण जायच्या आधी ज्या अनेक गोष्टींची चिंता करावी लागते त्यात तिथे "डोक्यावर छप्पर शोधणे" ही एक बाब असते.मी (व माझ्यासारखे अनेक) university च्या नावडत्या यादीत असल्यामुळे 'funding' (या विषयावर encyclopedia Britannica च्या जाडीचा ग्रंथ लिहिता येईल..)नव्हत.त्यामुळे रहायची जागा स्वस्त,university campus च्या बाहेर पण university च्या अगगगदी जवळ,चांगल्या facility असलेली अशी पहिजे.थोडक्यात आखुड शिंगाची ,भरपुर दुध देणारी, कमी चारा खाणारी,लाथ न मारणारी अशी गाय शोधायची होती.ती सुध्दा पोचल्यानंतर ३-४ दिवसात. अजुन महत्वाच म्हणजे room mates शोधायचे.या बाबतीत excuse नाही. कारण नाहीतर रस्त्यावर याव लागणार किंवा फुकटचे जास्त डॉलर जाणार.पण सुदैवानी माझ्या American host नी, Dan नी,मी पोचायच्या आधीच १-२ जागा बघुन ठेवल्या होत्या.त्यामुळे आत प्रश्न होता room mates चा. माझ्या बरोबर राजस्थानचा प्रणय होता (ज्यानी अमेरिकेत पाय ठेवल्याच्या पहिल्याच दिवशी American "hospital"ity चा अनुभव घेतला. अजुन दोन नग शोधण आवश्यक होत.एका प्राण्याशी यायच्या आधी एक आठवडा contact झाला होता.साकेत दोशी.(जोशी नाही...'दो'शी..जोशी असता तर माझ्या घराच्या १ कि.मी. परिसरात फिरकु दिला नसता.)तो आणि त्याचा contact कुणाल गुप्ता (गट्टाणी fame!!!..) २-४ दिवस आधी गेले होते.मी पोचल्यावर त्यांना परिस्थिती विचारली.येणारा प्रत्येकानी, माहित असलेल्या प्रत्येकाला, मी तुझ्याच बरोबर रहणार अस सांगितल होत. त्यामुळे प्रत्यक्षात lease sign करायची वेळ आल्यावर लाथाळ्या सुरु झाल्या. अनेक घर (भविष्यातली...) मोडली. शेवटी आम्ही lease sign केल.इथे आमची घरमालक एक company होती.त्यामुळे त्या company च्या एका manager नी आमची सगळी कागदपत्र केली.ही manager बाई म्हणजे एक विशेष प्रकरण होत.साडेपाच फुटापेक्षा उंच आणि अजस्त्र (दुसरा शब्द नाही ..खरच.),चेहेर्यावर अत्यंत तुसडे भाव.त्या office मधे गेल की अगदी पुण्यासारख वाटायच.कोणी तुमच्याकडे ढुंकुनाही पहाणार नाही.खर म्हणजे आम्ही गेलो तर भाड द्यायलाच जातो .पण पैसे मागायला आल्यासारखी वागणुक मिळते.आम्ही या manager ला २५ डॉलरवाली म्हणतो.कारण सुरवातीला नियम सांगताना"...भाड एक दिवस उशीरा दिल कि २५ डॉलर fine ,भिंतीवर खिळे वगैरे ठोकले तर २५ डॉलर fine, gallery मधे जड furniture ठेवलेला दिसल की २५ डॉलर fine (हा नियम मला आजपर्यंत बराच विचार करुनही कळलेला नाही.एक तर आमच्याकडे furniture नाही.कोणी आमच घर पाहिला तर त्याला इथे माणस रहातात की हे कपडे,बॅगा आणि भांड्यांच गोडऊन आहे अशी शंका येइल(चौघांचे चार cooker !!!).पण जरी असत तरी ते गॅलरीत बर्फा-पावसात ठेऊन आम्ही रिकाम्या घरात जमिनीवर का झोपलो असतो ? असो.)तर असा प्रकार होता.आमच्या या apartment मधे एक swimming pool आहे.खर म्हणजे त्याला swimming pool म्हणन तस चुक आहे.त्यात आम्ही चौघ एकदम उतरलो तर मुंबईच्या लोकल मधे उभ राहिल्यासारखी अवस्था होईल.पण फुकट असेल तर कधीतरी अंग विसळुन यायला काय हरकत आहे म्हणुन विचारायला गेलो. (आणि त्या डबक्याच्या बाजुला beach वर असतात तश्या खुर्च्या आहेत आणि कधीकधी त्यावर..असो)या facility ला military area ला असत तस कुंपण आणि कुलुप असलेला दार आहे.या कुलुपाची किल्ली मिळु शकेल का ? अस मी त्या office मधल्या गोड receptionist ला माझ्या गोड आवाजात विचारल.तर आतल्या खोलीमधुन ही manager बाई तुंबलेल्या म्हशीच्या आवाजात गरजली "deposit द्याव लागेल". गणपतीच्या दिवसातल्या मांडवासामोरच्या कारंज्याच्या आकाराच्या त्या डबक्यासाठी एक डॉलर सुध्दा द्यायची इच्छा नसल्याने आणि university मधे उत्तम swimming pool (फुकट) असल्याने, तिथुन ताबडतोब बाहेर पडलो.(आणि university pool ला beach वरच्या खुर्च्या नसल्या तरी खुर्चीवरच्या गोष्टी असतातच..)आमची building हा ही एक अजब प्रकार आहे.अमेरिकेत काही अनाकलनीय कारणामुळे दोन मजल्यांच्या मधे cement च्या slab घालत नाहित.लाकडासारखा काहितरी वापरतात.घराच्या भिंतीसुध्दा तशाच असतात.त्यामुळे आमचा शेजारी खदखदा हसला (weekend nights ना हसण वाढत आणि बदलत)की आमच्या कडे ऐकु येत.खालच्या मजल्यावरचा जेव्हा toilet flush करतो तेंव्हा आमच्या toilet मधुन गडगडात झाल्यासारखा आवज ऐकु येतो.(एकदा खुप गडगडाट होत होता तेव्हा मी जुलाबाच्या गोळ्या घेउन खाली जाणार होतो.लोकांनी आवरल.)तर अश्या २० वर्ष जुन्या building मधे ,५०० $ महिना भाड्यात ज्याकाही सुखसोयी मिळु शकतील (गडग़डाट वगैरे..)त्यासकट आमचा flat आहे.अजुन किमान २ वर्षतरी ही building उभी रहावी अशी आम्ही रोज सामुदाईक प्रार्थना करतो.आजवर तरी देवानी आमची प्रार्थना ऐकली आहे.

मागील पानावरुन

मी ज्या अमेरिक family मधे रहात होतो त्यांच्याबद्द्ल सांगण्यापुर्वी अजुन एका घटनेबद्द्ल (आणि एका महान व्यक्तिमत्वाबद्दल...)सांगण गरजेचा आहे. visa मिळाल्यावर माझ्या बरोबर याच university ला जाणारी माणस शोधायला सुरवात केली.बरेच दिवस मी एकटाच आहे अस मला वाटत होता.ज्यांना कोणाला मी university च नाव सांगत होतो तो/ती, ही कुठली university ? कधी नाव नाही बुवा ऐकल ...असा चेहरा करत होता.(ते sea-woods सारखाच..मी जातो तिथे एक तर कोणी येत नाही किंवा फुकट जेवायला मिळत असल्यासारखी गर्दी असते..मधली बातच नाही..)एकानी तर मला विचारला...Colorado state university का ? ...Colorado मधे आहे का रे ही ?...मी हो म्हटल्यावर त्याल भयंकर आश्चर्य वाटला. बहुधा "नाही..नाही..ही अलास्कामधे आहे ...Eskimo तिथे शिकायला आणि शिकवायला येतात" या उत्तराची अपेक्षा असावी. तात्पर्य university फारशी कोणाला माहीत नाही आणि त्यामुळे जाणारी माणस पण..(फक्त दिलिप ओक ..माझा counselor छाती ठोकपणे सांगत होता..its good university.) शेवटी एक माणुस सापडला. नाव गट्टाणी. आडनावात काही नसत.मान्य.पण तरी..असो. जाऊ दे. मी ७ ला जाणार होतो.मी ह्याला दोन तीन वेळेला विचारल. माझा e-ticket mail kela.दर वेळेला तो ६ ला जाणार अस सांगत होता.एकाच दिवसानी miss झाला..बरोबर कोणी असत, तर बर झाला असत म्हणुन जरा वाईट वाटल. नंतर ६ तारखेला याचा phone आला.उद्या भेटुच वगैरे.अधिक चौकशीअंती हा ६ ला निघणार म्हणजे घरातुन ६ ला निघणार.Plane ७च पहाटेचच.माझाच plane अस लक्षात आल. TCS मधे असे अनेक अनुभव आणि दगड पाहिल्यामुळे सोडुन दिल.माझ्या travel agent नी plane पण नामी शोधुन काढला होता. Mumbai-London. London ला ८ तासाचा holt. आणि मग (संपुर्ण कंटाळल्यावर..)London-Denver. मधल्या ८ तासात Heathrow विमानतळावर गट्टाणी बरोबर शिवाशिवी,कबड़ी खेळावी अशी योजना असणार. मग सहार विमानतळावर भेटायचा ठरल. ९ ला रात्री तिथे पोचल्यावर त्याला phone केला.मग अर्धा पाऊण तासाचा लपाछपी चा खेळ झाला आणि मी गट्टाणी समोर उभा राहीलो. खांबा सारखा उंच.हाता पायाच्या काड्या.चेहेर्यावर कोणतेही भाव नाहीत्.formal dress with formal shoes.गळ्यात एक छोटी office bag. लपाछपी च्या खेळात मी त्याच्या समोरुन गेलो तेव्हा तो ,जर एखादा माणुस office मधुन घरी जायचा कंटाळा आला आणि चला विमान बघायला जाऊ म्हणुन airport वर आला तर जसा दिसेल तसा दिसत होता.नमस्कार-चमत्कार झाल्यावर गट्टाणी नी पहिला ball टाकला. आपल्या सामानाकडे बोट दाखवुन मला विचारला "ह्याचा काय करायचा ?" (बॅगा उघडुन इथल्या इथे वाटुन टाकायच...)मग मी त्याचा हात धरुन check in-immigration मधुन घेऊन गेलो.London ला उतरल्यावर ह्यानी एक कोपर्यातला बाक पकडला आणि उशाला office bag घेऊन घरी झोपल्यासारखा जे झोपला ते विमान सुटायच्या आधी उठला. अमेरिकेत विमान उतरल. Immigration च्या queue मधे आम्ही उभे राहिलो. American Immigration म्हणजे जरा tension च काम असत. Immigration office तिथुनही सामान सुमानासट परत हाकलुन देउ शकतो.आमच्या पुढे २-३ लोका असताना मी गट्टाण्याला विचारला "तु कोणाकडे जाणार ?" माझ्याकडे Dan Birks चा (मी ज्या अमेरिकन family मधे उतरणार होतो त्यांचा) पत्ता आणि phone number होता.
"माझ्याकडे कुणाल चा phone number आहे. "..गट्टाणी.
"कोण कुणाल ?" मी.
"आधी गेला आहे. आपल्याबरोबर join करतो आहे."
"तु Indian Student Association ला initial accommodation साठी apply केला होतास का ?"
"हो"
"मग कुठल्या senior कडे तुझा allocation झाला ते पाहिला होतस का? "
"नाही."
"का ?"
"कुणालचा no आहे ना. "
"त्याच्याशी बोलला आहेस का आधी ?"
"नाही. mail केली होती."
"तो येणार आहे का तुला आणायला?".
"नाही"
"त्याचा पत्ता महित आहे का ?"
"नाही".
"???????"
एवढ्यात त्याची turn आली.आपण पुण्याहुन नगर ला जाताना सुध्धा राहायची सोय,तिथला no.वगैरे विचारुन घेतो.हा माणुस फक्त एक phone no घेउन (तो सुधा अश्या मुलाचा जो ४ दिवस आधी गेला आहे.)अमेरिकेत आला होता.Immigration form वर अमेरिकेत कुठे जाणार तो address लिहावा लागतो.ह्यानी university चा address लिहिला होता.ते बघुन immigration officer खवळला.त्यानी विचारला आत्ता कुठे जाणार तो पत्ता दे.यावर गट्टाण्यानी जे केला ते मी आयुष्यभर विसरणार नाही. महान संत परमपूज्य हरिभक्त परायण गट्टाणी महाराज यांनी माझ्याकडे बोट दाखवल.मी ह्याच्या बरोबर आहे.Immigration officer नी मला बोलावल आणि firing सुरु केला. तो साडेसहा फुटी काळा सांड होता. चिडलेला गेंडा किंवा रानगवा असाच दिसत असेल. पत्ता कुठे आहे ? रात्रीच्या ११ः०० वाजता तुम्ही रस्त्यावर जाणार का? मी माझ्याकडचा पत्ता दाखवुन, मी इथे जाणार आहे..university home stay program आहे.university नी माझी सोय केली आहे वगैरे सांगत होतो. "ह्याचा काय ? हा म्हणतो आहे हा तुझ्याबरोबर आहे.तो पण इथेच येणार आहे का ?"Immigration Officer."मला माहित नाही.हा माझ्या बरोबर नाही." सत्यमेव जयते. शेवटी कसातरी त्याला शांत केला. एवढ होऊनही गट्टाणी freezer मधे मेंदु ठेवल्यासारखा वागत होता.त्यानी त्याचा काम केला होता.शेवटी immigration officer नी माझाच पत्ता त्याच्याइथे लिहिला आणि आम्हाला सोडल.एक खुन माफ असता तर मी तेव्हा गट्टाणी संपवला असता. तिथुन customs ला गेलो.माझ्या एकुण एक बॅगा custom officer नी उघडल्या.इथे इथे नाच रे मोरा करत custom officer हे काय हे काय विचारत होता.त्यातुन माझा English. लाडु म्हणजे sweets, बाकरवडी म्हणजे crispy spring roll इथपर्यंत ठीक होता.पण नंतर मेतकुट,गोडा मसाला सगळच अवघड होता. सुमारे अर्ध्या तासानंतर मी custom room च्या floor वर चारही बाजुला चार अस्ताव्यस्त बॅगा घेउन उध्वस्त बसलो होतो.त्यावेळी मी जे काही मनात बोलत होतो ते custom officer ला translate होऊन कळल असत तर त्यानी माझ्या अंगावरचे कपडे सुधा जप्त करुन मला भारतात परत पाठवल असत. गट्टाणीची एकही बॅग उघडली नाही. तिथुन बाहेर पडल्यावर गट्टाण्याला पहिल्यांदा phone समोर उभा केला.तो नवसाचा नंबर लागत नव्ह्ता. रात्रीचे १२:०० वाजलेले.नव शहर.नवा देश.त्याला shuttle मधे घातला आणि Dan Birks यांच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो.Dan ला एक सौरभ येणार माहित होता. इथे दोन येउन उभे राहिले.सगळ्यात पहिल्यांदा मी मला आलेली Dan च्या mail ची print out ,Dan ला दाखवली आणि तुमच्या कडे राहाणारा तो मी हे सिध्द केला. नाहीतर गट्टाणी माझ्या bed वर आणि मी रस्त्यावर आलो असतो.त्यातच Dan नी अजुन एक बातमी दिली.माझ्या बरोबर अजुन एक Indian तिथे राहाणार होता.प्रणय.तो आदल्या दिवशी आला होता.तो hospital मधे आहे आणि त्याची surgery झाली. appendix ची.Dan ची बायको Barbara hospital मधे त्याच्या बरोबर होती.शेवटी माझ्या कडे betty नावाच्या international office च्या एका बाईचा no. होता. असावा म्हणुन शेवटच्या क्षणी मी घेतला होता.तिला १२:३० ला फोन लावला.तिनी university records मधुन एका senior चा पत्ता शोधुन काढला . Dan रात्री १ वाजता गट्टाणीमहाराजांना तिथे पोचता करुन आला.ग़ट्टाणी अध्यायावर पडदा पडला. माझा American family मधला stay असा सुरु झाला.

बुशची अमेरिका

जुनच्या पहिल्या आठवड्यात admission मिळाल्याचा कळल्यावर office मधे काम करण complete सोडुन दिला होता.Next target was visa. हजार documents आणि शेकडो सल्ले (लोका जगाच्या, भारताच्या, पुण्याच्या, कोथरुडच्या विविध भागातुन फोन,email आणि प्रत्यक्ष भेटुन सल्ले देत होती...एकानि तर मला ५ वीची , marksheet नक्की घेउन जा..लागते.. असा सांगितला..) घेऊन American consulate नावाच्या अप्रतीम जागी पोचलो.आत जाताना security check होता. त्यानी मला belt काढायला सांगितला.मला वाटला आता pant पण सोडायला लावातो की काय...(सांगितल असती तर तसच (म्हनजे pant न सोडता ) परत जायचा असा ठरवल होता.पण security officer नी ती वेळ येऊ दिली नाही.आत गेल्यावर एका लाकडी तुकड्यावर एक number लिहुन दिला.Interview साठीच्या waiting area चा वातावरण तर अवर्णनीय होता. With family आलेल्या लोकांची पोरबाळा रडत होती.कोणी प्रार्थना,जप करत होता. माझ्या शेजारी एक मुलगी बसली होति.ती लग्न करुन आता नवरा कडे चालली होती. मी हे तिला विचारला. कारण मला राहवल नाही. तिच्या हातात एक मोठा album होता.आणी त्यात लग्नाचे photo होते.Interview officer दाख़वायला आणले असणार.मला Interview office ची reaction पहायची होती... अजुन एक भयंकर मोठा folder होता...मी विचारला नाही पण नक़्क़ीच नवर्याच्या montesary पासुनच्या marksheet असणार्...ते नसत का...ठोकळे लावतो...गाणी म्हणतो...ते. या सगळ्या गोंधळात १० ते १२ खिडक्यांमधुन एकच वेळी random order मधे number announce करत होते.Sound Quality मुंबई लोकल announcement पेक्षा वाईट होती.माझा interview संपला तरी मला शेवट पर्यंत वाटात होता की माझी खिडकी चुकली.माझ्या आधी interview झालेली लोका बाहेर जाऊन काय वाटेल ते सांगत होती.ते ऐकुन आईनी जीव घाबरा केला होता.प्रत्यक्ष visa बघीतल्यावर सुध्धा तिची खात्री नव्ह्ती.(आता बहुतेक पटली आसेल...) शेवटी फारशी भानगड न होता american visa नावाचा तो एक कागद पदरात पडला. आणी मग आमच्या माता-पितरांनी आमच्या जाण्याची public announcement केली.visa च्या आधी FBI security होती. दोन्ही आज्यांना कोणालाही न सांगण्या बद्द्ल strict instruction होत्या. visa आल्यानंतर ह्या दोघींनी ही बातमी अवघ्या ३-४ तासात संपुर्ण पुण्या मुंबईत केली.This is called as ideal communication network. आणि मग ह्या नंतर जाई पर्यंत मला माझा लग्न ठरला आहे असा वाटात होता.लोक केळवणाला बोलवत होती. खरेदी चालली होती.लहानपणा पासुन मी माझ्यावर एवढा खर्च केला नसेल.मुलीचा नाव काय ? काय करते ? ह्याच्या सारखा university चा नाव काय ? कुठली city ?.मग लोकांचे अनुभव. ("माझ्या मित्राच्या जावयाच्या चुलत काकाचा मुलगा १० वर्षापुर्वी ह्या airlines नी गेला होता तेव्हा त्याची bag हरवली होती." मग ती airline drop. आणि इथे तिकिटाची बोंबाबोंब होती. माझा travel agent arebiya airways,kuwet airways वगैरेच्या गोष्टी करायला लागला होता.) मी एक handout छापुन घेनार होतो. ग़ेल्या गेल्या देऊन टाकायच. शेवटी एकदा सगळा संसार ( आईनी जेवणानंतर खायची सुपारी ठेवायला सुध्दा डबा दिला आहे...) bags मधे भरुन उडालो.७ तारखेला fort collins,colorado ला सुखरुप (प्रवासात फारसा काही न घडता) पोचलो. त्यानंतचे ६ दिवस एका american family मधे रहिलो.

स्वतःविषयी

जन्मगाव: पुणे

जन्मस्थळ: जन्माला आलो त्या हॉस्पीटलची पुढची खोली सदाशीव पेठेत आणि मागची खोली नारायण पेठेत होती.

आडनाव: देशपांडे

शाळा: नुतन मराठी विद्यालय

हे वाचुनसुध्दा तुम्हाला पुढे वाचायची ईच्छा आहे ? आमची (हे आदराथ्री घ्यायच...) हरकत नाही. पण नंतर तुमची असु शकते.शीशु शाळा,छोटी शाळा,मोठी शाळा - नुमवि आणि कॉलेज स.प. महाविद्यालय असल्यामुळे आमच्या (हे आदराथ्री घ्यायच...) आयुष्याची पहिली १७ वषॅ शिक्षण प्रसारक मंडळी नावाच्या अद्वितिय संस्थेत गेली.ही संस्था आणि जन्मगाव यांचा परिणाम तुम्ही पाहातच आहात.जे मित्र भेटले तेही असेच.( असे मित्र असले की वेगळे शत्रु लागत नाहीत.)त्यामुळे सध्या आम्ही (हे बहुवचनी...तुम्हाला ही आदराथ्री-बहुवचनी ची भानगड सुधरत नसेल,झेपत नसेल,पचत नसेल तर सोडुन द्या...its advance stuff,you know..)आठवड्यातुन एकदा तरी भेटुन टोमणे मारणे,कुजकट बोलणे,एखाद्याला हरभर्याच्या झाडावर चढवणे,एखाद्या झाडावरच असल्यास त्याला खाली उतरविणे असे उपक्रम राबवित असतो.सध्या पुण्यातुन उध्धटपणा,कुजकटपणा,खत्रुडपणा,माज हे गुण लुप्त होत चालले आहेत.याचे आम्हाला अतीशय़ दुःख आहे.म्हणुनच हे बहुमुल्य गुण जपण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो.हे तुम्हीसुधा करु शकता.त्यासाठी पुण्यात असणे गरजेचे नाही.क्लिंटनच्या अमेरिकेतील टेक्सास मधुनही हे करु शकता.....आजच नव्हे आत्ताच सुरवात करु शकता....कारण.................कारण............................................अशा फालतु गोष्टी वाचण्यात एवढा वेळ घालवणारे तुम्ही नक्कीच रिकामटेकडे असणार !!!!....

भरकणारे विचार


निष्ठा... त्याग....समाजसुधारणा....वचनबध्द्ता.......जुनाट, गंजलेले, फाटुन जीर्ण झालेले शब्द...
चारचौघात उच्चारले तर कुत्सित हास्यानी स्विकारले जातील...किंवा विचित्र नजरांनी....

माझ्या देशाच्या इतिहासातील मला पटलेल्या या तीन गोष्टी...गोष्टी ? माझे मोडकेतोडके विचारच म्हणा ना....चुकीचे की बरोबर ? मला माहित नाही. ....कारण छोट्या शाळेत शिकविलेल्या, 'चुक कि बरोबर ?' प्रश्नात सोडवलेल्या या संज्ञांचे अर्थ आज शोधताना मेंदुची प्रत्येक पेशीन पेशी ताणली गेल्याचा भास होतो...

एक

काळ - अतिप्राचीन
स्थळ - महर्षी व्यासांच महाभारत
व्यक्ती - कर्ण

महाभारत म्हणजे व्यक्तीरेखांच कोलाज॑॑ ....पण अर्थपुर्ण...विषयगर्भ...एकमेकांत गुंतलेल्या असंख्य बर्यावाईट व्यक्तीरेखा...या सगळ्यांना छेद देऊन जाणारी...त्या अद्वितीय महाकाव्याला व्यापणारी व्यक्तीरेखा..कर्ण.
कुमारीमातेला त्याही काळात समाजात स्थान नव्हत. म्हणुन कुंतीनी स्वतःच्या हातांनी नदीत सोडलेल कर्ण. प्रत्यक्ष सुर्यपुत्र. सारथ्याच्या घरी वाढलेला. स्वसामर्थानी सर्वश्रेष्ठ धनुर्धर झालेला. कवचकुंडलधारी राधेय. दुर्योधनानी राजकीय स्वार्थासाठी त्याला राजमुकुट चढवला. प्रतिष्ठा दिली. आणि कर्ण दुर्योधनाचा झाला. सर्वश्रेष्ठ दानवीर ...त्या असीम तेजाचा अंश असलेल्या त्या महारथ्याला दुर्योधनाचा स्वार्थ कळला नसेल काय ?पण एकदा दुर्योधनाला दिलेला शब्द त्यानी कधीही मागे घेतला नाही. श्रीकृष्णानी त्याला त्याच जीवनरहस्य सांगितल्यावरही. कुंतीनी आवाहन करुनही. शेवट पर्यंत तो दुर्योधनासाठी लढला. आणि विझला. विझला ? खरच अर्जुनानी त्याचा वध केला ? का त्यानेच स्वतःच जीवन संपवल ? कवचकुंडल इंद्राला देउन ? का दिली त्याने कवचकुंडल ? सुर्यदेवांनी, त्याच्या पित्यानी, स्वप्नात येउन सांगितल असतानाही . त्याग म्हणुन ? सर्वश्रेष्ठ दानवीर व्हायच होत म्हणुन ? नाही कदाचीत. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता हे त्याला माहित होत म्हणुन. कवच कुंडलहीन, कुंतीच्या वचनाने बध्द, ब्राम्हणानी शापलेला, परशुरामानी धिक्कारलेला कर्ण अजिंक्यच होता. त्याच प्राणप्रिय 'विजय' नावाच धनुष्य हातात असताना तो वधला जाण शक्य नाही हे माहित असल्यानीच श्रीकृष्णानी अर्जुनाला तो बाण मारायला प्रवृत्त केल. आणि आपण जगलेल आयुष्य, जपलेली मुल्य सिध्द करण्यासाठी त्या सुर्यपुत्रानी तो स्विकारला....अर्जुनाला आपल्या प्राणांच शेवटच दान देउन॑ !!!.

दोन

काळ - ख्रिस्तापुर्वीचा भारत.
स्थळ - मगध
व्यक्ती - आचार्य चाणक्य

जिच्याबद्दल इतिहासाला जवळपास काहिच माहित नाही, पण जिने देशाचा इतिहासच बदलला, अशी व्यक्ती म्हणजे चाणक्य. धनानंदाच्या मगधात कुठेतरी जन्माला आलेला विष्णु नावाचा मुलगा. धनानंदाच्या कोठडीत वडिलांचा मृत्यु झाल्यावर तक्षशीलेत पोचला. स्वतःच्या अफाट बुध्दीमत्तेच्या जोरावर अनेक विषयांचा अभ्यास करुन आचार्य चाणक्य झाला. आणि त्याच वेळी विश्वविजयाला निघालेला ग्रीसचा अलेक्झांडर भारताच्या दारात येउन उभा राहिला. तक्षशीलेच्या अंभीराजाने तत्परतेने त्याच्याशी संधी करुन त्याला आत घेतला. मगधाच्या धनानंदाकडे मदत मागायला गेलेल्या चाण्यक्याला त्यानी धक्के मारुन बाहेर काढल. चाणक्याची शिखा सुटली. राज्यकर्त्यांच्या बेपर्वाने आणि मदांधतेने संतप्त झालेल्या त्या ब्राम्हणानी प्रतिज्ञा केली...धनानंदाला संपवीन....भारत यवनांच्या ताब्यातुन मुक्त करीन..मगच शिखा बांधीन...आणि मग सुरु झाला थक्क करणारा चाणक्याच्या बुध्दीमत्तेचा खेळ. स्वाभिमान विसरलेल्या, निती-अनितीच्या वेड्या कल्पनांनी जखडलेल्या समाजाला आचार्यानी व्यवहार शिकविला. साम, दाम, दंड, भेदाचा वापर शिकविला. एक माणुस, बलाढ्य, प्रचंड शक्तिशाली पण भ्रष्ट मदांध सत्ता बुध्दीच्या जोरावर खाली आणु शकतो हे दाखवुन दिल. रानात फिरण्यार्या चंद्रगुप्ताचा सम्राट चंद्रगुप्त झाला. यातुन जे साम्राज्य निर्माण झाल ते पुढील ४०० वर्ष टिकल.
या सगळ्या खेळात दोन व्यक्तींची कहाणी बघण्यासारखी आहे. एक चाण्याक्यइकाच प्रसिध्द - मगधाचा महामंत्री, अमात्यराक्षस, दुसरा - काळाच्या ओघात हरवलेला मगधाचा सेनापती - धवलगिरी. मगधाच्या सेनापतीनी चाणक्याच्या जाळ्यात अडकुन नंदाशी विश्वासघात केला. चंद्रगुप्ताच्या सेनापतीपदाच गाजर दाखवुन आचार्यंनी त्याला मगधाविरुध्द जाण्यास भाग पाडल. मगधाच्या पाडावानंतर त्यालाच विश्वासघाती म्हणुन घोषित केल. आचार्यांच्या या चालीनी हतबल झालेला सेनापती आचार्यांना विचारतो - माझ्याबरोबर हा विश्वासघात का ? यावर आचार्य उत्तर देतात - " तु सेनापतीपदासाठी नंदाचा विश्वासघात केलास. चंद्रगुप्ताबरोबर तु एकनिष्ठ राहशील याची खात्री काय ? मगधाच्या विश्वासघात्यांबरोबर विश्वासघात चुक आहे काय ? "
याउलट अमात्यराक्षस. शेवटपर्यंत नंदाशी एकनिष्ठ राहिला. नंद चुक आहे हे माहित असुन. मगधाच्या हितासाठी. चाणक्याबरोबर बुध्दीबळाचा खेळ जीव तोडुन खेळला. चंद्र्गुप्ताला संपवण्याचे आणि नंदाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न आपली सर्व शक्ती पणाला लावुन केले. याच निष्ठेसाठी चाण्यक्यानी त्याला चंद्र्गुप्ताचा महामंत्री होण्याच आवाहन केल. स्वतःला बाजुला ठेउन .....निस्वार्थपणे...!!

तीन

काळ - १९३०
स्थळ - १९३० सालातले अत्यंत कर्मठ पुणे.
व्यक्ती - रघुनाथ कर्वे

१९३०. स्वातंत्रलढ्यानी भारलेला काळ. पहिल्या युध्दातुन सावरलेला समाज. धर्म, रुढी, परंपरा यांचा जबरदस्त पगडा असलेल पुण. धोंडो केशव कर्वांना स्त्रिशिक्षणासाठी, विधवाविवाहासाठी वाळीत टाकणार. स्त्रिशिक्षण, विधवाविवाह, स्त्रिस्वातंत्र यासारख्या शब्दांनी दचकणारी माणस आणि धर्म बुडाला अशी ओरड करणारे ब्राम्हण. अशा काळात आणि कर्वे कुटुंबच्या वातावरणात वाढलेल्या रघुनाथ कर्वांनी समाजाच्या एक अतिशय नाजुक आणि जटिल प्रश्नाला हात घातला. संततीनियमन. स्वतः डॉक्टर होउन, परदेशातुन संततीनियमनाची साधन आणुन या पुण्यात त्याच्या प्रसाराला सुरवात केली. पत्नीला त्याच शिक्षण दिल. ही साधन, त्याचे उपयोग, स्त्रीपुरुषांची शरीररचना, समागम या विषयी शास्त्रीय लिखाण केल. या विषयावरच पहिल नियतकालीक चालवल. स्त्रीशिक्षणासारख्या साध्या गोष्टीबद्द्लच अनस्था असणार्या त्या समाजाला या संकल्पना म्हणजे जबरदस्त धक्का होता. रघुनाथ कर्वांचा आवाज त्याकाळी कोणापर्यंतच पोचु शकला नाही. वाढती लोकसंख्या हा एक प्रश्न आहे किंवा होणार आहे हे त्या द्रष्टया माणसानी १९३० सालात ओळखल होत हे पहिल की थक्क व्हायला होत. पण स्वातंत्र्योत्तर काळातही याची कोणी दखल घेतली नाही. पत्नीच्या मृत्युनंतर अंतिमसंस्कारासाठी एकही माणुस पुढे आला नाही इतक दुर्दैव.
पण आज तरी आपण त्यांच ऐकतो आहोत का ? २०२० साली भारत जागतीक महासत्ता होइल न होइल पण तो निश्चित लोकसंखीय महासत्ता बनणार आहे. २०२० साली जगात सर्वाधीक लोक भारतात रहातील. भारतात ? की गरिबीत ? दहशदीखाली ? आजच्या आपल्या सर्व समस्यांच मुळ लोकसंख्येच्या विस्फोटामधे आहे हे आपण कधी समजुन घेणार ? हाताला काम आणि पोटाला अन्न नसणारी माथी लवकर भडकतात. हवी तशी वळवता येतात. भ्रष्टाचारानी पोखरलेली राजकीय, शासकीय, कायदा आणि सुव्यवस्थेची यंत्रणा किती दिवस उभी राहु शकेल ? जी विविधता आजपर्यंत आश्चर्यकाररित्या एक राहिली ती यापुढे एक राहिल का ? इतिहास हे चुक की बरोबर पडताळुन पहाण्याच पुस्तक नाही का ? यावर उपाय ?????
हे विचार कधी थांबतील अस वाटत नाही. सध्या आजुबाजुला घडणारी प्रत्येक घटना, अनुभव, शिक्षण, वाचन परत परत विचारांची फटाक्यांच्या लडीसारखी माळ सुरु करत........उपाय शोधत रहात.......दहशदवादावरचे.......भ्रष्टाचारावरचे .....राजकीय निर्लज्जपणावरचे............

आस्तिक असतो तर देवाकडे कळकळीची प्रार्थना केली असती आणि शांत झोपलो असतो.

...........नसलेल्या देवाला आणि असलेल्या नियतीला,
कर्णाची वचनांसाठी जगण्याची आणि मुल्यासाठी मरण्याची वृत्ती दे...
चाणक्याची भ्रष्ट यंत्रणेला उलथुन टाकणारी बुध्दी आणि हट्ट दे....
रघुनाथ कर्वांच द्रष्टेपण दे....