Saturday, October 25, 2008

घर-दार

MS साठी visa मिळाल्यानंतर "आता फक्त हा ticket काढणार आणि (एकदाचा..) जाणार" अशी अनेकांची समजुत असते (विशेषतः घरच्यांची आणि नातेवाईकांची.तिथे विमानतळावर उतरल्यावर अमेरिकान government च्या वतीनी chauffeur-( by the way Google वर spelling सुध्दा शोधता येतात !!)- driven car मग university कडुन राहायची सोय अश्याही कल्पना असव्यात.) पण जायच्या आधी ज्या अनेक गोष्टींची चिंता करावी लागते त्यात तिथे "डोक्यावर छप्पर शोधणे" ही एक बाब असते.मी (व माझ्यासारखे अनेक) university च्या नावडत्या यादीत असल्यामुळे 'funding' (या विषयावर encyclopedia Britannica च्या जाडीचा ग्रंथ लिहिता येईल..)नव्हत.त्यामुळे रहायची जागा स्वस्त,university campus च्या बाहेर पण university च्या अगगगदी जवळ,चांगल्या facility असलेली अशी पहिजे.थोडक्यात आखुड शिंगाची ,भरपुर दुध देणारी, कमी चारा खाणारी,लाथ न मारणारी अशी गाय शोधायची होती.ती सुध्दा पोचल्यानंतर ३-४ दिवसात. अजुन महत्वाच म्हणजे room mates शोधायचे.या बाबतीत excuse नाही. कारण नाहीतर रस्त्यावर याव लागणार किंवा फुकटचे जास्त डॉलर जाणार.पण सुदैवानी माझ्या American host नी, Dan नी,मी पोचायच्या आधीच १-२ जागा बघुन ठेवल्या होत्या.त्यामुळे आत प्रश्न होता room mates चा. माझ्या बरोबर राजस्थानचा प्रणय होता (ज्यानी अमेरिकेत पाय ठेवल्याच्या पहिल्याच दिवशी American "hospital"ity चा अनुभव घेतला. अजुन दोन नग शोधण आवश्यक होत.एका प्राण्याशी यायच्या आधी एक आठवडा contact झाला होता.साकेत दोशी.(जोशी नाही...'दो'शी..जोशी असता तर माझ्या घराच्या १ कि.मी. परिसरात फिरकु दिला नसता.)तो आणि त्याचा contact कुणाल गुप्ता (गट्टाणी fame!!!..) २-४ दिवस आधी गेले होते.मी पोचल्यावर त्यांना परिस्थिती विचारली.येणारा प्रत्येकानी, माहित असलेल्या प्रत्येकाला, मी तुझ्याच बरोबर रहणार अस सांगितल होत. त्यामुळे प्रत्यक्षात lease sign करायची वेळ आल्यावर लाथाळ्या सुरु झाल्या. अनेक घर (भविष्यातली...) मोडली. शेवटी आम्ही lease sign केल.इथे आमची घरमालक एक company होती.त्यामुळे त्या company च्या एका manager नी आमची सगळी कागदपत्र केली.ही manager बाई म्हणजे एक विशेष प्रकरण होत.साडेपाच फुटापेक्षा उंच आणि अजस्त्र (दुसरा शब्द नाही ..खरच.),चेहेर्यावर अत्यंत तुसडे भाव.त्या office मधे गेल की अगदी पुण्यासारख वाटायच.कोणी तुमच्याकडे ढुंकुनाही पहाणार नाही.खर म्हणजे आम्ही गेलो तर भाड द्यायलाच जातो .पण पैसे मागायला आल्यासारखी वागणुक मिळते.आम्ही या manager ला २५ डॉलरवाली म्हणतो.कारण सुरवातीला नियम सांगताना"...भाड एक दिवस उशीरा दिल कि २५ डॉलर fine ,भिंतीवर खिळे वगैरे ठोकले तर २५ डॉलर fine, gallery मधे जड furniture ठेवलेला दिसल की २५ डॉलर fine (हा नियम मला आजपर्यंत बराच विचार करुनही कळलेला नाही.एक तर आमच्याकडे furniture नाही.कोणी आमच घर पाहिला तर त्याला इथे माणस रहातात की हे कपडे,बॅगा आणि भांड्यांच गोडऊन आहे अशी शंका येइल(चौघांचे चार cooker !!!).पण जरी असत तरी ते गॅलरीत बर्फा-पावसात ठेऊन आम्ही रिकाम्या घरात जमिनीवर का झोपलो असतो ? असो.)तर असा प्रकार होता.आमच्या या apartment मधे एक swimming pool आहे.खर म्हणजे त्याला swimming pool म्हणन तस चुक आहे.त्यात आम्ही चौघ एकदम उतरलो तर मुंबईच्या लोकल मधे उभ राहिल्यासारखी अवस्था होईल.पण फुकट असेल तर कधीतरी अंग विसळुन यायला काय हरकत आहे म्हणुन विचारायला गेलो. (आणि त्या डबक्याच्या बाजुला beach वर असतात तश्या खुर्च्या आहेत आणि कधीकधी त्यावर..असो)या facility ला military area ला असत तस कुंपण आणि कुलुप असलेला दार आहे.या कुलुपाची किल्ली मिळु शकेल का ? अस मी त्या office मधल्या गोड receptionist ला माझ्या गोड आवाजात विचारल.तर आतल्या खोलीमधुन ही manager बाई तुंबलेल्या म्हशीच्या आवाजात गरजली "deposit द्याव लागेल". गणपतीच्या दिवसातल्या मांडवासामोरच्या कारंज्याच्या आकाराच्या त्या डबक्यासाठी एक डॉलर सुध्दा द्यायची इच्छा नसल्याने आणि university मधे उत्तम swimming pool (फुकट) असल्याने, तिथुन ताबडतोब बाहेर पडलो.(आणि university pool ला beach वरच्या खुर्च्या नसल्या तरी खुर्चीवरच्या गोष्टी असतातच..)आमची building हा ही एक अजब प्रकार आहे.अमेरिकेत काही अनाकलनीय कारणामुळे दोन मजल्यांच्या मधे cement च्या slab घालत नाहित.लाकडासारखा काहितरी वापरतात.घराच्या भिंतीसुध्दा तशाच असतात.त्यामुळे आमचा शेजारी खदखदा हसला (weekend nights ना हसण वाढत आणि बदलत)की आमच्या कडे ऐकु येत.खालच्या मजल्यावरचा जेव्हा toilet flush करतो तेंव्हा आमच्या toilet मधुन गडगडात झाल्यासारखा आवज ऐकु येतो.(एकदा खुप गडगडाट होत होता तेव्हा मी जुलाबाच्या गोळ्या घेउन खाली जाणार होतो.लोकांनी आवरल.)तर अश्या २० वर्ष जुन्या building मधे ,५०० $ महिना भाड्यात ज्याकाही सुखसोयी मिळु शकतील (गडग़डाट वगैरे..)त्यासकट आमचा flat आहे.अजुन किमान २ वर्षतरी ही building उभी रहावी अशी आम्ही रोज सामुदाईक प्रार्थना करतो.आजवर तरी देवानी आमची प्रार्थना ऐकली आहे.

1 comment:

Unknown said...

Ekdam sahi.......... mastach.......
Well, I think now we know much about our property manager (PPS), it deserves a blog of its own ....... :)